1538110208-uri_main

‘उरी’चा दमदार ट्रेलर रिलीज

मनोरंजन

देशातील अनेक जवान उरी हल्ल्यात शहीद झाले होते. आता या घटनेवर आधारीत ‘उरी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे याच हल्ल्याची थरारक कथा आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
‘उरी’चा ट्रेलर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. विक्की कौशल आणि यामी गौतम यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. भारतीय सेनेद्वारे पाकिस्तान केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. विक्की कौशल ‘उरी’मध्ये एका भारतीय कमांडोची भूमिका साकारत आहे. तसेच यात किर्ती कुलहरी आणि परेश रावल यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ११ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *