67665-ochllmqjjb-1504628462

उमा भारती यांचा आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

देश

केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमा भारती यांनी म्हटलंआहे की,निवडणुकीकडे लक्ष देण्याऐवजी पुढील दीड वर्ष आपण सर्व लक्ष अयोध्येतील राम मंदिर आणि गंगा नदीच्या स्वच्छतेकडे देणार .आपण सत्ता सोडून संपूर्ण वेळ गंगा नदी आणि प्रभू रामासाठी घालवणार आहे’, असं उमा भारती यांनी सांगितलं आहे. मात्र यावेळी त्यांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
उमा भारती यांनी गंगा नदीच्या किनारी 2500 किमी पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केली. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीला ही यात्रा सुरु होईल, जी पुढील दीड वर्ष सुरु असेल असं त्यांनी सांगितलं. ‘सत्ता सोडून आपण गंगा नदीच्या किनारी गेलं पाहिजे असं मला वाटतं. मी पुढील दीड वर्ष तेच करणार आहे. मात्र मी प्रचार करत राहीन. अखेरच्या श्वासापर्यंत मी राजकारणाशी जोडलेली असेन’, असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *