kolegav-traning

कोळेगाव येथे नितीन पाटील यांच्या पुढाकाराने महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

कोकण गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई व्यापार

कोळेगाव प्रतिनिधी : सध्या दुष्काळामुळे  ग्रामीण भागातील युवा पिढी शहरांकडे वळत असताना आणि गावात रोजगारावाचून दररोजची होणारी महिलांची पायपीट बंद करून त्यांना घरखर्चासाठी आणि इतर खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजोक नितीन पाटील यांनी कोळेगावमधील नितीन पाटील युवा मंचाच्या साथीने त्यांच्या एस एन पी हँडीक्राफ्ट या कंपनीच्या माध्यमातून कोळेगाव येथील महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे काम दिले जाणार आहे. याचे प्रशिक्षण कोळेगाव मधील महिलांना पारसे नगर येथे देण्यात आले. गावातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी  नितीन पाटील आणि युवा मंचाच्या मदतीने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे . या रोजगार उपलब्धीद्वारे गावातील महिलांच्या हाताला काम मिळण्याबरोबरच गावाच्या विकासातही भर पडणार आहे. यावेळी नितीन पाटील  यांनी यांच्या एस एन पी हँडीक्राफ्ट या कंपनीच्या मार्फत गावामध्ये आणखी योजना राबवून रोजगार निर्मिती करण्याचे आशवासन दिले . या प्रशिक्षणाला गावातील शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवली .32

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *