732130-encounter-970

जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

देश

जम्मू- काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
बडगाममधील छत्तरगाम येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती. सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळी परिसरात शोधमोहीम राबवली असता एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर सुरक्षा दलातील तीन जवानही यात जखमी झाले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *