IMG-20181128-WA0050.jpg

शिवराज पुकळे यांनी घेतली जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य सचिव यांची भेट

गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र

कोळेगांव,प्रतिनिधी

निरा-देवधर धरण प्रकल्पाच्या प्रस्तावित पाईप लाईन कॅनाॅलच्या योजनेमध्ये माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असणारी गावे बचेरी, शिगोर्णी, पिलीव, पठाणवस्ती,काळमवाडी,सुळेवाडी, गारवाड, मगरवाडी, भांब, फडतरी, लोंढे-मोहीतेवाडी, जळभावी, कोथळे, तरंगफळ या गावांचा सदर योजनेमध्ये समावेश करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील शेतकर्यांचे प्रतिनिधी मा. शिवराज पुकळे ऊर्फ भाऊसाहेब यांनी माजी जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य सचिव मा. प्रभाकर देशमुख साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली .
माळशिरस तालुक्यातील दुष्काळी भागातील जनतेचा दुष्काळ कायमचा हटवन्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील यासंदर्भात मा.प्रभाकर देशमुख साहेब यांनी चर्चा केली. निरा-देवधर च्या धरणाचे पाणी आनायचे व योग्य पद्धतीने नियोजन करून माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असनारा भाग सुजलाम सुफलाम करायचा असे देशमुख साहेब म्हटले.त्यांनी महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून काम पाहीले आहे. त्त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेची संकल्पना त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राबवली आहे . यामुळे ही भेट माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळीअसनार्या गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महत्वाची ठरनार आहे. मा.प्रभाकर देशमुख यांच्या प्रशासकीय कामाचा अनुभव आणि अधिकारी वर्गात असलेला दबदबा पाहता या भेटीमुळे शिवराज पुकळे यांच्या लढाईस बळ मिळनार हे नक्की.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *