nitinpatil

नितीन पाटील यांनी केला जिल्हाधिकारी कार्यालयात तालुक्यातील रस्त्यांच्या अपघांताविषयी आरटीआय अर्ज

कोकण देश महाराष्ट्र मुंबई

कोळेगाव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील महूद-वेळापूर या खराब रस्त्यांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणारे आणि जखमी होणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे . गेल्या तीन वर्षांपासून प्रमुख महामार्ग असूनही हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही . त्यामुळे अपघातातील जखमींचा आलेख वाढत आहे. तरीही प्रशासनाला जाग येईना, त्यामुळे कोळेगाव मधील रहिवासी असलेले एसएनपी सॉफ्टवेअरचे प्रमुख नितीन पाटील यांनी माहितीचा अधिकार या कायद्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या तीन वर्षात महूद – वेळापूर मार्गावर अपघातामध्ये मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या किती आहे हे जाणून घेऊन याद्वारे सरकारला आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आरटीआय अर्ज दाखल केला आहे . याद्वारे तालुक्यातील लोकांमध्ये खराब रस्त्यांबद्दल   जागृती निर्माण करून सरकारला रस्त्याचे दुरुस्ती काम लवकरात लवकर सुरु करण्यास भाग पाडले जाणार आहे .

rti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *