nitinpatil

खराब रस्त्यांविषयी नितीन पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना ट्वीट

कोकण देश महाराष्ट्र मुंबई

कोळेगाव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील कोळेगावचे रहिवासी असलेले एसएनपी सॉफ्टवेअरचे प्रमुख मा . नितीन पाटील यांनी तालुक्यातील खराब रस्त्यांची स्थिती राज्याचे मुख्यमंत्री मा . देवेंद्र फडणवीस व महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना ट्वीट करून त्यांच्या पुढे मांडली आहे . नितीन पाटील यांनी आपल्या ट्वीट मध्ये रस्त्यांची परस्थिती मांडताना ,’राज्यातील जनतेला मॅग्नेटीक महाराष्ट्रापेक्षा मूलभूत गरजांनी परिपूर्ण असलेला महाराष्ट्र पाहिजे ‘ अश्या शब्दात तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यांकडे  मुख्यमंत्र्यांना जातीने लक्ष देण्याची विनंती केली आहे .  तालुक्यातील वेळापूर -महूद या प्रमुख महामार्ग असलेल्या रस्त्याची अतिशय दयनीय अशी अवस्था असताना राज्यातील सरकारचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे . पावसाळ्यात या रस्त्यांची स्थिती आणखी वाईट असते ,याचा नाहक त्रास वाहनचालक आणि तालुक्यातील जनतेला सोसावा लागत आहे.

tweet

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *