Maharashtra Swabhiman Paksh

कोळेगाव – महूद आणि कोळेगाव – वेळापूर रस्त्याचे काम पूर्ण होई पर्यंत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष शांत बसणार नाही.

गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र
कोळेगाव प्रतिनिधी – मागील काही वर्षांपासून वेळापूर – महूद रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. रस्त्याच्या जागोजागी भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच या मार्गावरून अवजड वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मूळ रस्ता गायब झाला आहे का? अशी परिस्थिती लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. याचा येथील स्थानिक जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले असताना देखील येथील स्थानिक प्रशासन, आमदार,खासदार का शांत बसले आहेत ? रस्त्याचे काम मंजूर झाले असताना देखील येथे होणाऱ्या अपघातांमध्ये अजून किती लोकांचे जीव गमावण्याची वाट येथील प्रशासन पाहत आहे ? असा सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नितीन पाटील यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक दिवशी कोळेगाव येथील शेकडो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन कोळेगाव – महूद आणि कोळेगाव – वेळापूर असा प्रवास करतात. यात होणाऱ्या छोट्या अपघातांची नोंद होत नाही.अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून धुळीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. यापासून होणाऱ्या फुफुसाच्या आणि खड्यांमुळे होणाऱ्या मणक्यांच्या  आजारांना कोण जबाबदार राहणार ? त्यामुळे , महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आता शांत बसणार नाही. कोळेगावच्या जनतेसाठी पक्षाचे सरचिटणीस,युवा नेते माजी खासदार श्री.निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेगाव – महूद आणि कोळेगाव – वेळापूर रस्त्याचे काम पूर्ण होई पर्यंत आम्ही लढा देणार. असे यावेळी नितीन पाटील यांनी सांगितले.
IMG-20181119-WA0028 IMG-20181119-WA0029 IMG-20181119-WA0031 IMG-20181119-WA0032
नुकतीच कोळेगाव येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची माळशिरस तालुक्यातील पहिल्या शाखेची स्थापना झाली. कोळेगाव मधील जनतेच्या विकासासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गावातील शेकडो तरुणांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेचे निर्माण केले आहे. जो पर्यंत येथील रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आमचा लढा सुरु ठेवणारच. असा इशारा कोळेगाव येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी दिला आहे. यामध्ये विजय पारसे, दिनेश पारसे,सोमनाथ पारसे,किशोर पारसे,अनिकेत पारसे, अक्षय तोरणे,दत्तात्रय पारसे,गणेश पारसे,लक्ष्मण पारसे,सागर पारसे,ओंकार पारसे,धनंजय पारसे, मंहेद्र पारसे,गणेश गेजगे ,अभिजित पारसे,शशिकांत पारसे,सुरज पारसे,चौरंगीनाथ पारसे,अभि पाटील ,गणेश धांडोरे ,अनिरुद्ध धोत्रे ,सुधीर बेंदगुडे ,समाधान पारसे,अतुल पारसे,मनोहर पारसे,सचिन पारसे,शिवतेज पारसे,वैभव गुळीग ,महादेव भंडगे ,नवनाथ ढोबळे ,लखन काटे ,दत्ता गेजगे ,राणोबा पारसे,भूषण वाघमारे ,विक्रम वाघमारे ,शंकर पारसे,काशिलींग पारसे,कैलास पारसे असे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *