kolegoan-truck-accident

कोळेगाव मध्ये लोखंडी कॉईल घेऊन जाणारा ट्रक पलटला

कोकण महाराष्ट्र मुंबई

कोळेगाव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील कोळेगाव मध्ये सांगोला अकलूज रोडवर काल दुपारी लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रक मधील लोखंडी कॉईल ला बांधलेली साखळी तुटून लोखंडी कॉईल एका बाजूवर झाल्याने ट्रक पलटला . मुंबईवरून आलेला हा ट्रक सांगोला अकलूज रोडवर आल्यांनतर या मार्गावरील खड्यांमुळे बांधलेल्या साखळीला हिसके बसून ती तुटल्यामुळे कोळेगाव मधील बस स्टॅन्ड च्या अवघे काही अंतर पुढे जाऊन हा ट्रक पडला . या मध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ,पण ट्रक चे थोडेफार नुकसान झाले आहे . काल कोळेगाव मध्ये बस स्टॅण्डवर महूद बाजारानिमित्त गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल होती .त्यामुळे गावातील लोंकांवरून मोठी वेळ गेल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे . मुंबई वरून आलेला हा ट्रक कर्नाटक राज्यात चालला होता ट्रक मध्ये फक्त ड्राइवर आणि आणखी एकजण असल्याचे समजले . रोडवर पडलेल्या या ट्रक मुळे  मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे , तर आज ट्रक क्रेन आणून हटविण्याचे काम केले जाणार आहे .kolegoan-truck-accidentkolegoan-truck-accident

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *