Ind-vs-Aus_Playing-XI-1-620x400

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द

क्रीडा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १९ षटकात ७ बाद १३२ धावा केल्या होत्या. बेन मॅकडरमॉटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *