CBSE exam_0_0_1_0_0

दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर १ मार्चपासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) सुरु होईल. २० मार्चला बारावीची लेखी परीक्षा, तर २२ मार्चला दहावीची लेखी परीक्षा संपणार आहे.
मंडळाने गुरुवारी परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध केले. दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून दहावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनर्परीक्षार्थ्यांकरिता अंतिम संधी असलेल्या जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वेळापत्रक केले आहे.
परीक्षेपूर्वी शाळा-महाविद्यालयांकडे छापील स्वरूपातील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळ व व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल होणारी वेळापत्रके गृहीत धरू नयेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *