5a85d6a41c16c95a382b0c1216f89686

तामिळनाडुमध्ये जोरदार पाऊस

देश

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामिळनाडुच्या बऱ्याच भागाला आज जोरदार पावसाने झोडपले. पुढील दोन दिवस तामिळनाडुत अशीच स्थिती राहील असे हवामान खात्याने म्हटले आहे. आज चेन्नई, कांचीपुरम, थिरूवल्लूर, आणि विल्लुपुरम या जिल्ह्यांना मोठ्या पावसाचा तडाखा सोसावा लागला. अवेळी आलेल्या या पावसाने पीकांचे मोठे नुकसान झाले.

तरंगमबडी आणि नागपट्टणम जिल्ह्यात 70 मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली. या राज्याला गज या चक्रीवादळाचाही धोका निर्माण झाला होता कारण हे वादळ केरळवरून या राज्याच्या दिशेने वळले होते. पण सुदैवाने या चक्रीवादळाचा फार मोठा तडाखा या राज्याला बसला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *