Tukaram-Mundhe-715x400

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढें यांची बदली

महाराष्ट्र

कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची अखेर अवघ्या नऊ महिन्यांमध्ये नाशिकच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली केल्याचं पत्र मुंढेंना देण्यात आलं. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून नियुक्तीच्या ठिकाणी जाण्याचे निर्देश तुकाराम मुंढेंना देण्यात आले आहेत.
मुंबईतील नियोजन विभागाचं सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे मुंढे यांची वर्णी लावण्यात आली. यापूर्वी २०१० आणि २०१२ मध्ये त्यांची बदली मुंबईत झाली होती. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *