morcha

शेतकरी-आदिवासी बांधवांचा मोर्चा मोठय़ा संख्येने मुंबईत दाखल

मुंबई

हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शेतकरी आणि आदिवासी पुन्हा मोठय़ा संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. उन्हाळी अधिवेशनापूर्वी मार्च महिन्यात नाशिकवरून मुंबईत पायी आलेल्या शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मोर्चाने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या. वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढला आहे.राज्याच्या वेगवेगळया भागातून मोठया संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आझाद मैदान न सोडण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे.
ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्य़ातील आदिवासी आणि मराठवाडय़ातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार सुमारे १८ जिल्ह्य़ांमधील १२ हजारांहून अधिक आदिवासी-शेतकरी या मोर्चासाठी मुंबईत आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *