dhwalsinh-mohite-patil

सभासदांचा पै ना पै दिल्याशिवाय अंगावर गुलाल घेणार नाही – डॉ धवलसिंह

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

माळशिरस : सभासदांचा कारखान्यावर विश्वास असून या सभासदांचा पै ना पै दिल्याशिवाय अंगावर गुलाल घेणार नाही असे प्रतिपादन डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी श्री.शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रतापसिह मोहिते पाटील गटाचा प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ माळशिरस येथील ग्रामदैवत मारुती मंदिरात फोडल्या नंतर श्री संत सावता माळी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये बोलताना व्यक्त केले.यावेळी पद्मजादेवी मोहिते पाटील,डॉ मारुती पाटील,जीवन जानकर,पांडुरंग वाघमोडे,बाळासाहेब लवटे,गौतम माने,अजय सकट,बाळसाहेब सरगर,बाजीराव माने,आप्पासाहेब कर्चे,भानुदास सालगुडे,माउली पाटील,विष्णू नारनवर,पी.ई.कुलकर्णी,अतुल सरतापे,अशोकराव तडवळकर,शामराव बंडगर,नारायण माने,आदि मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी मारुती मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते नाराळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना धवलसिह म्हणाले गेल्या चार वर्षापासून राज्यातील सर्वच साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. कारखान्यास अर्थ पुरवठा करणा-या बँकेने अर्थ पुरवठा न केल्याने व नोटाबंदीमुळे कारखान्यास अर्थसहाय्य मिळू शकले नाही. त्यामुळे सभासदांचे देणे कारखाना देवू शकला नाही. त्यानंतर कारखान्यावर प्रशासक नेमल्यामुळे त्याची जबाबदारी प्रशासकावर गेल्याने तो कायद्याच्या काचाट्यात सापडला गेला परंतु कारखान्याने सातत्याने सभासदांचे हित पाहिले असून सभासदांचा कारखान्यावर विश्वास असून त्यास कदापि तडा जावू देणार नाही वेळ प्रसंगी स्वताची मालमत्ता गहाण ठेवून सभासदांचे देणे देवू असा विश्वास व्यक्त करून प्रतापसिंह मोहिते पाटीलच्या गटाला विजय करण्याचे आवाहन केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *