images (1)

रायगड जिल्ह्यातील हा भाग होणार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट

कोकण मुंबई

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरित भाग,तसेच पालघर जिल्ह्यातील पालघर तालुका, वसई तालुक्यातील उर्वरित भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
त्याचबरोबर मेट्रो मार्ग 10 – गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड), मेट्रो मार्ग 11 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्ग 12 च्या प्रकल्प अहवालास यावेळी मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे निर्माण झाले होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 146 वी बैठक आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बांद्रा कुर्ला संकुलातील कार्यालयात झाली.
मुंबई व परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. या विकसनशील क्षेत्राचा सुयोग्य व नियोजित विकास होण्यासाठी एमएमआरडीएने हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत ठेवला होता. यामध्ये संपूर्ण पालघर तालुका, वसई तालुक्यातील ऊर्वरित भाग, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल व खालापूर तालुक्याचा ऊर्वरित भागाचा समावेश आहे.यामुळे पूर्वी असलेल्या 4254 किमी. क्षेत्र वाढून आता एमएमआरडीएचे क्षेत्र हे 6272 कि.मी. इतके होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *