s

सॅमसंग गॅलेक्सी ए ९ स्मार्टफोन भारतात लाँच

व्यापार

सॅमसंगने गॅलेक्सी ए ९ हा नवा स्मार्टफोन मंगळवारी भारतात लाँच केला. रिअर बाजूला चार कॅमेरे असलेला हा जगातला पहिला स्मार्टफोन आहे. या फोनच्या रिअरवर ८,२४, ५ व १० एमपीचे चार कॅमेरे दिले गेले असून सेल्फीसाठी फ्रंटला २४ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. या फोनचे प्रीबुकिंग सुरु झाले असून तो २८ नोव्हेंबर पासून मिळू शकणार आहे.

सॅमसंगने गॅलेक्सी ए ९ फीचर्स

६ जीबी व्हेरीयंटची किंमत ३६९९० रुपये ८ जीबी व्हेरीयंटची किंमत ३९९९० रुपये

१२८ जीबी स्टोरेज मायक्रोकार्डच्या सहाय्याने ते ५१२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा

स्क्रीन ६.३ इंची फुल एचडीचा

अँड्राईड ८.० ओएस

क्विक चार्ज सपोर्ट करणारी ३८०० एएमएचची बॅटरी

रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर

फेस रेकग्निशन

या वर्षातील स्मार्टफोनचे हे शेवटचे मॉडेल असून एचडीएफसीच्या क्रेडीट डेबिट कार्डवरून फोनची खरेदी केल्यास ३ हजार रु. कॅशबॅक दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *