a891bb0f49522498ce586382d0072fba

गोरेगाव आरे कॉलनीत धक्कादायक प्रकार, विहिरीत दोन मुलींचा मृतदेह सापडल्याची घटना

मुंबई

गोरेगाव आरे कॉलनीत धक्कादायक प्रकार घडला. विहिरीत दोन मुलींचा मृतदेह सापडल्याची घटना मंगळवारी रात्री समोर आली आहे. या दोघींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुनिता किसन आगे (१७) आणि प्रविणा गणपत रावते (१६) अशी त्या दोन मुलींची नावे आहेत.
मंगळवारी रात्री गोरेगाव आरे कॉलनीतील खंबाटा पाड्यात हा धक्कादायक प्रकार घडला त्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दल व पोलिसांना कळविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या दोघींना विहिरीतून बाहेर काढून सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सिद्धार्थ रुग्णालयाचे डॉक्टर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *