anil-babar

निरा-देवधर च्या पाण्यासाठी टेंभू योजनेचे जनक आ.अनिल (भाऊ)बाबर यांच्याशी शिवराज पुकळे यांची चर्चा

गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

कोळेगांव/शाहरुख मुलाणी

माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असणारी गावे बचेरी, शिगोर्णी, पिलीव, पठाणवस्ती, काळमवाडी,सुळेवाडी, गारवाड, मगरवाडी, भांब, फडतरी, लोंढे-मोहीतेवाडी, जळभावी, कोथळे, तरंगफळ या गावांचा निरा-देवधर पाणी योजनेमध्ये समावेश नाही. त्यामुळे सदर गावांचा निरा-देवधर धरण प्रकल्पाच्या पाईप लाईन कॅनाॅलमध्ये समावेश करण्यासाठी माळशिरस तालुक्याचे युवा नेते मा.शिवराज पुकळे यांनी टेंभू योजनेचे जनक आमदार अनिल(भाऊ)बाबर यांच्याशी चर्चा केली.
शिवराज पुकळे यांनी आ. अनिल(भाऊ)बाबर यांची भेट घेतली यावेळी माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असनार्या गावांची सध्यस्थिती व निरा-देवधर च्या प्रस्तावित पाईप लाईन कॅनाॅल योजनेविषयी माहिती दिली असता आ. अनिल(भाऊ)बाबर यांनी मुंबईत या अधिवेशन काळात माझ्याकडुन जेवढे सहकार्य करता येईल तेवढे मी करतो असे सांगितले.
यापूर्वी माझ्या मतदार संघातील दुष्काळ मी बघीतला आहे त्यामुळे दुष्काळी जनतेचे हाल मला माहीत आहे. *_जसे आटपाडी-खानापूर ला टेंभू आनली तसे माळशिरस तालुक्यासाठी निरा-देवधर च्या पाण्यासाठी मदत करनार असे आ.अनिलभाऊ यांनी सांगितले.
टेंभू योजनेची संकल्पना आ.अनिल(भाऊ)बाबर यांनी मांडली होती आनी ती पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत त्यामुळे टेंभू योजनेचे जनक आमदार अनिल(भाऊ)बाबर यांच्या भेटीमुळे निरा-देवधर प्रस्तावित पाईप लाईन कॅनाॅलमध्ये माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असनार्या गावांचा समावेश करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा भरपूर फायदा होनार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *