nilesh-rane-social

निलेश राणेंचे सोशल मीडिया वरून कोळेगाव मधील युवकांच्या कार्याला समर्थन

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

कोळेगाव प्रतिनिधी  : नुकतेच माळशिरस तालुक्यातील कोळेगाव मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेचे उदघाट्न झाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार मा.निलेश राणे यांचे जवळचे सहकारी असलेले एसएनपी सॉफ्टवेअर चे प्रमुख नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेगाव येथे त्यांच्या गावा मधील युवक वर्गाने या शाखेची स्थापना केली . गावाच्या विकासात हातभार लावणे आणि गावातील इतर समस्या सोडविण्याच्या हेतूने या शाखेचे निर्माण झाले आहे.या माध्यमातून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार श्री.नारायण राणे यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत. कोळेगाव मधील युवकांनी या शाखेच्या माध्यमातून समाजकार्याला सुरवात केली.याचे कौतुक मा . निलेश राणे यांनी ट्विट करून केले . याद्वारे  गावातील युवकांमध्ये आत्मविश्वास बळकट करण्याचे काम मा .निलेश राणे यांनी केले आहे. तर तरुणांच्या कार्याची  दखल घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *