uttam-jankar

उत्तमराव जानकरांनी केले पिलीव येथे मेडिकल स्टोअरचे उदघाट्न

गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

पिलीव :  माढा लोकसभा मतदार संघाचे भावी खासदार म्हणून गाजत असलेले , लोकनेते मा . श्री . उत्तमराव जानकर साहेब यांनी काल माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे मोहन तात्या करांडे यांच्या आयुष मेडिकल अँड जनरल स्टोअर्स याचे उद्घाटन केले . जानकरांचे वाढते वर्चस्व पाहता आणि तालुकयातील मोठ्या प्रमाणात असलेला धनगर आणि दलित समाजाचा असलेला पाठिंबा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सतत अग्रेसर असल्याने  त्यांच्याकडे माढा लोकसभा मतदार संघाचे भावी खासदार म्हणून पहिले जात आहे . तत्पूर्वी पिलीवकरांनी जानकर साहेबांच्या आगमनाची जय्यत तयारी सकाळपासूनच करून ठेवली होती . साहेबांच्या हस्ते रिबीन कापून मेडिकल स्टोअरचे चे उदघाट्न झाले . या उदघाट्न समारंभाला जानकारांसोबत अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते  व गावकरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *