sonam-jamsutka-start-

नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी केला लोकोपयोगी कामाचा शुभारंभ

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई :काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक २१० मध्ये काल दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी सायं. ५. ३० वाजता विविध लोकोपयोगी कामांचा शुभारंभ करण्यात आला . जनतेला दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे सोनम जामसुतकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले . सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका सौ . सोनम मनोज जामसुतकर व मनोज जामसुतकर यांच्याबरोबर अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते ,त्याचबरोबर विभागातील शेकडो नागरिकांनी या शुभकार्याला आपली उपस्थिती दाखवली.
– या कामांचा झाला शुभारंभ
१. भायखळा जुनी पोलीस वसाहत मलनिःसारण वाहिन्यांची चेम्बर्सहीत दुरुस्ती व परिसराची सुधारणा
२. रेजिना पाचिस कंपाऊंड येथील १३ शौचालयांची दुरुस्ती / नूतनीकरण
३. लव्हलेन,बीआयटी चाळ येथील महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाचे नूतनीकरण
४. कोपरगाव इस्टेट येथील ८ शौचालयांची दुरुस्ती / नूतनीकरण
५. ब्राह्मणवाडी,प्रिय कुटीर या इमारतीच्या मलनिःसारण वाहिन्यांची चेम्बर्सहित दुरुस्ती व परिसराची सुधारणा
६. हत्तीबाग,ताराचंद बिल्डिंग या इमारतीच्या मलनिःसारण वाहिन्यांची चेम्बर्सहित दुरुस्ती व परिसराची सुधारणा
७. हत्तीबाग,उनवाला बिल्डिंग या इमारतीच्या मलनिःसारण वाहिन्यांची चेम्बर्सहित दुरुस्ती व परिसराची सुधारणा
८. हत्तीबाग,प्रमिला भवन या इमारतीच्या मलनिःसारण वाहिन्यांची चेम्बर्सहित दुरुस्ती व परिसराची सुधारणा
९. सीताफळ वाडी,लाईट हाऊस या इमारतीच्या मलनिःसारण वाहिन्यांची चेम्बर्सहित दुरुस्ती व परिसराची सुधारणा

1234

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *