congress-melava

काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा झाला संपन्न

कोकण देश महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : २०१९ मध्ये होण्याऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेसची मोट बांधण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसने घेतलेला दक्षिण मुंबई लोकसभेच्या भायखळा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस बुथ अध्यक्ष,प्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा काल प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण तसेच मा.केंद्रीय राज्यमंत्री मिलींद देवरा यांच्या उपस्थितीत मा . आमदार मधू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्यास मा.आमदार मधु चव्हाण यांच्याबरोबरच , नगरसेविका सोनम जामसुतकर, मा. नगरसेवक मनोज जामसुतकर तसेच भायखळा विभागातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी,पी.सी.सी. महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, सेवादल, एन.एस.यु.आय. ओबीसी, एस.सी, अल्पसंख्यांक, सोशल मिडीया, सहकार, मानवाधिकार इत्यादी विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *