01

अंबरनाथ मध्ये होणार राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन

कोकण मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अंबरनाथ : अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयामध्ये कोमसाप युवाशक्ती मंडळातर्फे येत्या ८ आणि ९ डिसेंबरला राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन होणार आहे . राज्यातील साहित्य क्षेत्राचा विकास होण्याबरोबरच राज्यातील तरुण पिढी या क्षेत्राकडे आकर्षीत करण्याच्या मानस असल्याचे कोमसाप युवाशक्ती मंडळाचे कार्यकर्त्यांनी संवादात सांगितले . या साहित्य संमेलनात साहित्याची मेजवानी तर मिळणारच आहे त्याबरोबरीने तरुणांच्या विचारांना पुष्टी देणाऱ्या परिसंवाद , मुक्तसंवाद , चर्चा याचेही आयोजन केले आहे. कविता , नाटक , अभिवाचन या आणि अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत साहित्य क्षेत्रातील उत्तम साहित्यिकांचा सहवास आणि तरुणांचा आवाज ह्या साहित्य संमेलनातून आपण अनुभवणार आहोत. या साहित्यसंमेलनात एक खास कवी कट्टा असणार आहे . आपल्या कोमसापच्या प्रत्येक जिल्ह्यातून या कवीकट्ट्यासाठी केवळ दहा नावे मागविली जात आहेत.ही नावे आपाआपल्या जिल्हा अध्यक्षांकडे येत्या 25 तारखेपर्यंत द्यावीत.. जिल्हाध्यक्षांनी या आपल्या सदस्यांची नावे सिद्देश साळुंखे आणि प्रणाली चंदनशिवे या युवा सदस्यांकडे द्यावीत. असे आवाहन करण्यात आले आहे .
कार्यक्रमाचे स्थळ – महात्मा गांधी विद्यालय , अंबरनाथ
संपर्क -९८२०१६३१२७ ९६६४४८८२८०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *