1A

निलेश राणे यांनी घेतली आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची भेट

कोकण देश महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : गेले कित्येक दिवस पेटत असलेला मराठा आरक्षणाचा वणवा अजूनही विझलेला नाही. मराठा आरक्षणासाठी कित्येक युवकांनी आणि आंदोलकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी सरकारला जाग येईना. याच मुद्यासाठी गेले १६ दिवस मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या सकल मराठा क्रांती महामोर्चाची आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेशजी राणे यांनी भेट घेतली.
यावेळी माजी खासदार निलेश राणेंनीसुद्धा ‘सरकारने आपला अंत पाहू नये मराठा आरक्षणासाठी वाट्टेल ते करायला तयार आहोत ‘ अश्या शब्दात आंदोलकांमध्ये स्फुरण भरले. गेले १६ दिवस आमरण उपोषणास बसलेल्या सकल मराठा क्रांती महामोर्च्याची दखल घेण्यास सरकार तयार होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *