sarsoli

सारसोली प्रिमीयर लीग मधून मिळणार लाखो रुपयांची बक्षिसे

कोकण क्रीडा देश महाराष्ट्र मुंबई

रोहा तालुक्यातील सारसोली येथे ‘सारसोली चषक २०१९’ या क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले जाणार आहे. आपल्या देशाचे क्रिकेट वेड पाहता दरवेळेसप्रमाणे यंदाही सारसोली प्रिमीयर लीग ला क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू यांचा भरपूर प्रतिसाद असेल यात शंका नाही .
२०१९ मधल्या मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचे उदघाट्न केले जाणार आहे.खेड्यापाड्यातील क्रिकेट खेळाडूंचा विकास आणि त्यांची दखल घेण्यासाठी सारसोली मधील ग्रामस्थ मंडळीने सारसोली प्रिमीयर लीग ची सुरवात केली आहे.या स्पर्धेद्वारे खेळाडूंमधील गुणांना वाव मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर देण्यात येण्याऱ्या बक्षिसांमुळे हि लीग अधीक रंजक बनते . ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना ज्ञाय मिळण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ आहे . १२ जानेवारी ते १४ जानेवारी या दरम्यान या स्पर्धेचा थरार आपल्याला पाहण्यास मिळेल. तसेच हि स्पर्धा युट्यूब वर सुद्धा पाहण्याची सोय सारसोली ग्रामस्थांनी केली आहे . या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस १,११,१११ रुपये ,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ५५,५५५ आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस २५,५५५ रुपयांचे असणार आहे . त्याचबरोबर मॅन ऑफ दि मॅच आणि मॅन ऑफ दि सिरीज साठी सोन्याची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत . तरी उत्सुक क्रिकेट टीमने लवकरात लवकर नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे .

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *