road

माळशिरस तालुक्यातील सांगोला -अकलूज रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोळेगाव प्रतिनिधी : सांगोला ते अकलूज हा प्रमुख महामार्ग असतानाही सत्तारूढ पक्षाचे याकडे दुर्लक्ष होत आहे ,अकलूज पासून कोळेगाव पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम मागील २ वर्षांपासून रेंगाळले आहे ,प्रमुख महामार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इतर राज्यातील तसेच आसपासच्या शहरातील अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते त्याचबरोबर या भागात साखर कारखाने असल्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक मोठ्या प्रमाणात चालतात यामुळे रस्त्याची अवस्था फारच वाईट झालेली आहे, यातून रस्त्याला पडलेले मोठे खड्डे आणि त्यातून उडणारी धूळ आणि माती ,यामुळे होणारे सततचे छोटेमोठे अपघात याचा त्रास कोळेगाव,फळवणी आणि आसपासच्या गावातील नागरिकांना आणि वाहनचालकांना सोसावा लागत आहे . खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे ,याचा नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे .
रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम लवकर न चालू केल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा ईशारा नागरिकांकडून सरकारला दिला जाणार आहे .

road1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *