prthviraj

माजी मुख्यमंत्री ,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस घेणार कार्यकर्ता मेळावा

कोकण महाराष्ट्र मुंबई

मंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,आमदार मा . श्री . पृथ्वीराज चव्हाण आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मा .श्री . मिलिंद देवरा यांनी २०१९ मधील होण्याऱ्या लोकसभा निवडणुकांची मोट बांधण्याच्या दृष्टिकोनातून येत्या रविवारी दि . १८-११-२०१८ रोजी ३१ व्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि १८४ व्या भायखळा विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसचे बुथ  अध्यक्ष, बुथ प्रतिनिधी व सक्रीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे .  मा.आमदार अण्णा ऊर्फ मधु चव्हाण,मा.अध्यक्ष – म्हाडा ( मंत्री दर्जा ,वरिष्ठ उपाध्यक्ष-मुंबई काँग्रेस.) यांनी या मेळाव्यास भायखळा मतदार संघातील काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना  व पदाधिका-यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे . हा मेळावा रविवार, दि.१८/११/२०१८ रोजी सकाळी ९:३० वाजता मम्माबाई हायस्कुल हॉल, व्होल्टास कंपनीजवळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, मुंबई-३३ येथे आयोजित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *