manoj-jamsutkar-birthday

माजगाव ताडवाडी चे मा. नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या वाढदिवसाचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात पार .

कोकण महाराष्ट्र मुंबई

मंबई : राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्रीचे ऋणानुबंध जपणारे ,आपल्या निस्वार्थ समाजसेवेने लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारे ,गोरगरीब जनतेचे वाली,
कामगारनेते ,लोकहितवादी ,मा. नगरसेवक श्री.मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त माजगाव ताडवाडी येथील बीआएटी चाळ क्र . ११ येथे दि . १२-११-१८ रोजी सायं . ६ वाजता अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते . सत्ता असो वा नसो सदैव सर्व सामान्य जनतेचा विचार करणारे आणि त्यांच्या समस्यांना दाद मिळवून देणारे मा.नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच कार्यकर्त्याचीं माजगाव ताडवाडी येथे लगबग दिसत होती.हा कार्यक्रम सोहळा मुंबईचे क्रमांक एक चे आमदार अमीन पटेल , कामगारनेते भाई जगताप ,माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . विद्यमान नगरसेविका सौ . सोनम मनोज जामसुतकर व मनोज जामसुतकर यांनी केक कापून सोहळ्याची सुरवात केली. उपस्थितीत कार्यकर्ते तसेच युवक वर्गाला जामसुतकरांनी मार्गदर्शन करत ,अशीच साथ आणि प्रेम भविष्यातही देण्याचे आवाहन केले आणि उपस्थितीत सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

manoj2manoj 5manoj6manoj1manoj6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *