maharashtra-swabhiman-paksha

कोळेगाव मधील युवक करणार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेचे निर्माण

कोकण महाराष्ट्र मुंबई

कोळेगाव प्रतिनिधी : श्री . नारायणराव राणे हे संस्थापक – अध्यक्ष असलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व पक्षाचे सरचिटणीस माजी .खासदार श्री . निलेश राणे यांच्या
प्रभावी व्यक्तिमत्व व विचारांना प्रेरित होऊन माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील युवकांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबरोबर काम करण्याची इच्छा दर्शवली असून लवकरच श्री.नितीन पाटील यांच्या मार्गद्शनाखाली पक्षाच्या शाखेचे निर्माण कोळेगाव मध्ये करणार आहेत . माजी खासदार मा . निलेश राणे यांचे तडफदार नेतृत्व आणि सामान्य लोकांबद्दल त्यांचे असणारे प्रेम यामुळे तरुण वर्गामध्ये त्यांची लोकप्रियता वाढत आहे . या शाखेच्या माध्यमातून गावातील अडचणी आणि समस्या सोडवण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर गावामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व वेगवेगळ्या योजना राबवून गावाच्या विकासात हातभार लावण्याचे काम या शाखेच्या माध्यमातून होणार आहे .

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *