tiger-attack

वाघाच्या हल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू

कोकण महाराष्ट्र मुंबई
चंद्रपूर : टी -१ अर्थात अवनी या वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण रंगलेले असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील पेंढरु या गावात वाघाच्या हल्ल्यात आणखी एक महिला ठार झाली आहे. सखुबाई कस्तुरे (६५) असे या महिलेचे नाव आहे.
सखुबाई या काल (शुक्रवार दि ९ ) शेतात शेतीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. रात्री त्या घरी परत न आल्याने गावकर्यांनी त्यांचा शोध सुरु केला. त्यावेळी त्या जंगलात मृतावस्थेत आढळून आल्या. चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील जंगलप्रवण जिल्हा आहे.
काही दिवसांपूर्वीच यवतमाळ येथे अवनी या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. मात्र ती जिवंत सापडली नाही. मात्र अखेरीस तिला ठार मारण्यात आले. तिचे दोन बछडे अद्याप सापडलेले नसून ते देखील नरभक्षी झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अवनीच्या मृत्यूवरून राजकारण तापले असून केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली. वाघिणीला जिवंत पकडायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले होते. मुनगंटीवार यांनी देखील गांधी यांना प्रत्युत्तर दिले होते. वाघिणीच्या मृत्यूनंतर सर्वच विरोधकांनी मुनगंटीवार यांना धारेवर धरले. अखेरीस अवनी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *