brothers-murder-on-bhaubeej

भाऊबीजेच्या दिवशीच केली बहिणीसमोर भावाची गोळ्या घालून निर्घृण हत्या

महाराष्ट्र

गाझियाबाद : भाऊबीजेच्या दिवशीच गाझियाबादमध्ये दिवसाढवळ्या काही गुंडांनी बहिणीच्या डोळ्यांदेखत तिच्या भावाची गोळ्या घालत निर्घृण हत्या केली. ही घटना कवी नगर भागात घडली.

मनोज हा आपल्या बहिणीला तिच्या सासरहून माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. बहीण-भाऊ ग्रेटर नोएडाहून आपल्या घरी परतत होते. पण, रस्त्यातच काही बाईकस्वार गुंडांनी त्यांचा रस्ता रोखत त्यांची लूटमार करू लागले. मनोजने या लूटमारीचा विरोध केला असता गुंडांनी त्याच्यावर गोळी झाडली. बहिणीच्या शरीराला खेटून गेलेली ही गोळी तिच्या भावाला लागली. त्यानंतर गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. गाझियाबाद पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, मनोजला गंभीर अवस्थेत सर्वोदय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *