raj-web

राज ठाकरे यांचे भाजपवर दिवाळी फटाके फोडणे सुरूच

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : ‘गेल्या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे नाही ओवाळणार’ असे भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणत असल्याचे दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर फटकारे ओढले आहेत. शुक्रवारी असलेल्या भाऊबीजचे निमित्त साधत राज यांनी व्यंगचित्र साकारले आहे.

भाजप सरकारने २०१४साली आश्वासने देऊन सत्ता मिळवली. ‘५ वर्षात देशात १०० स्मार्ट सिटी करणार’, ‘पाकिस्तानला धडा शिकवणार’, ‘शेतक-यांचे उत्पन्न दुपट् करणार…’ अशा मोदी सरकारने २०१४साली थापा दिल्या असल्याचे व्यंगचित्रात साकारण्यात आले आहे. २०१८साली ‘राफेल भ्रष्टाचार’, ‘पेट्रोल-डिझेलचे वाढते दर’, ‘परदेशातून काळा पैसा आलाच नाही’, ‘निवडणूक आयोगाची गळचेपी’ आदी मुद्यांच्या पाट्या दाखवल्या आहेत.

भाऊबीजनिमित्त भारतमातेकडून ओवाळणी घेण्यासाठी मोदी मोठ्या आशेने पाटावर बसल्याचे दाखवले आहे. मात्र मोदी सरकारने २०१४साली जी आश्वासने दिली होती ती २०१८साल उजाडले तरी पूर्ण झाली नाहीत, अनेक भ्रष्टाचार उघडकीस आले असे व्यंगचित्रामधील पाट्यांवर दाखवण्यात आले आहे. २०१९साली भारत मोदी सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही, त्यामुळे भारत पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे राज यांनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *