menka-gandhi

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मेनका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

देश महाराष्ट्र मुंबई राजकीय

नवी दिल्ली : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अवनीच्या मृत्यूबद्दल जबाबदारी निश्चित करायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

जर सुधीर मुनगंटीवार यांनी किंचित अधिक संवेदनशीलता दाखवली असती तर अवनीला वाचविता आले असते, असे मत मेनका गांधी यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, मी विनंती करते या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करा आणि मुनगंटीवार यांनी या पदावरुन काढून टाकता येऊ शकते का, याचीही विचार केला जावा.

दरम्यान याबर प्रतिक्रिया देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मेनका गांधी यांनी कोणाच्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा कुपोषण आणि लहान मुलांचे मृत्यू या मुद्यांवर काम करावे. मला वाघांचे महत्व माहिती आहेच पण त्याचबरोबर मानवी जीवनही तेवढेच महत्वपुर्ण आहे. मला कळत नाही ही बाब त्यांच्या का लक्षात येत नाही. जर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांना माझे ओझे वाटत असेल तर ते मला याबाबत सांगतील. हा निर्णय मेनका गांधी घेऊ शकत नाहीत. तसा त्यांना अधिकारही नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *