fraud

सांगली येथील कुपवाड एमआयडीमध्ये तब्बल 1 कोटी 20 लाखाची फसवणूक: आठ जणांवर गुन्हा

कोकण महाराष्ट्र मुंबई

सांगली : कुपवाड एमआयडीसीतील अंबाई अल्कोहोल प्रा. लि. या कंपनीची एक कोटी 20 लाख रूपये किंमतीची मशिनरी मालकाची परवानगी न घेता परस्पर विक्री करून आठ जणांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक श्रीनिवास जयनारायण बजाज यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे.

यामध्ये संशयित महेश श्रीकांत पागनीस, तेजस प्रकाश शहा, अजरप्पु सुर्यय नारायणमूर्ती, सुहास मगदूम, अविनाश पाटील, सतीश पाटील, चंद्रकांत हरपाळे, कुलदीप कुलकर्णी यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाड एमआयडीसीत अंबाई अल्कोहोल प्रा. लि. ही कंपनी श्रीनिवास बजाज, अमरनाथ पाटील, जयश्री पाटील वर्षा पाटील, अनुसया बजाज या पाच जणांच्या मालकीची आहे.

ही कंपनी २०११ साली या पाच जणांनी महेश पागनीससह आठ जणांना विक्री करण्याचा करार केला होता. त्यानुसार महेश पागनीस यांनी पाच कोटी रूपयांचे धनादेश दिले होते. या धनादेशामधील पाच लाखाचा एकच धनादेश वटला होता. तर बाकीचे सर्व चेक बाद झाले होते. त्यानंतर महेश पागनीस यांनी ही कंपनी विकत घेण्यास असमर्थता दाखविली व महिना ९ लाख रूपये भाडय़ाने चालविण्याची तयारी दाखवली होती. आम्ही कंपनी चालू केली, त्यावेळी मशिनरी व्यवस्थित होत्या, असे बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

काही दिवसापूर्वी कंपनीचे मूळ संचालक अमरनाथ पाटील हे कुपवाड एमआयडीसीत कंपनी कशी काय चालू आहे हे बघण्यासाठी आले असता कंपनीतील दहा लाखाचे दोन एमएसचे स्टोअरेज, एक लाखाचे तीन वॉटर, साठ लाखाचे डिस्टीलेशन टॉवर, पंचवीस लाखाचे वॉक्युम पंप, चार लाखाच्या पाच एच.पी.विद्युत मोटारी, वीस लाखाचे केमिकल साहित्य अशा एक कोटी वीस लाख रूपयाच्या मशिनरी साहित्य जागेवर नसल्याचे दिसले. पाटील यांनी ही माहिती मूळ पाच मालकांना सांगितली. संचालक बजाज यांनी महेश पागनीस, तेजस शहासह आठ जणांनी संगनमत करून आमच्या कंपनीतील मशिनरी व साहित्य आमचे संमतीशिवाय परस्पर विकून आमची फसवणूक केल्याची तक्रार कुपवाड पोलिसात दिली. सहाय्यक निरीक्षक संग्राम शेवाळे तपास करीत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *