45549804_452863671911454_31

राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून भाजपावर हल्लाबोल चालूच

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : “बाबांनो, गेल्या साडेचार वर्षात तुम्ही जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींमधले आकडे ऐकून मीही थक्क झाले,” अशा भावना खुद्द लक्ष्मी व्यक्त करत असल्याचे दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बुधवारी असलेले लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत राज यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

 या व्यंगचित्रात मोदी, गडकरी आणि फडणवीस यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यांच्यापुढे लक्ष्मी उभी असून “तुमच्या फेकाफेकीच्या आकड्यांच्या खेळामुळे” आपण थक्क झाल्याच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे.
भाजपचे सरकार आल्यापासून विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा होत आहेत. विकासाच्या कामासाठी भाजप सरकार हजारो, कोट्यवधीच्या घोषणा करत असून हा निव्वळ आकड्यांच्या खेळ असल्याची टीका राज यांनी अनेकदा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *