DrYa3G5WwAAXDLI-1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजरी केली चीन-भारत सीमेवर जवानांनसोबत दिवाळी

देश महाराष्ट्र मुंबई

केदारनाथ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. तेथील विकासकामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी भारत-चीन सीमेवर असलेल्या जवानांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत दिवाळी साजरी केली. यावेळी जवानांनी भारत माता की जय व वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य म्हणून मला भारतीय जवानांबरोबर राहण्याची संधी मिळाली. मी वन रॅंक वन पेन्शनबद्दल खूप ऐकले होते. सरकारे आली आणि गेली. पण मी तुमच्याशी निगडित असल्याने मी तुमच्या भावना समजू शकलो. पंतप्रधान म्हणून तुमची स्वप्नपुर्ती करणे ही माझी जबाबदारीही होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *