Nitesh-Rane (1)

; औरंगाबादला संभाजीनगर नाव कधी देणार,आमदार नितेश राणेंचा शिवसेनेला सवाल

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : मागील चार वर्षापासून केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असलेली शिवसेना औरंगाबादला संभाजीनगर नाव कधी देणार? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

फैजाबाद जिल्ह्याला अयोध्या असे नाव दिल्यावर आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला हा प्रश्न विचारला आहे. घरात बोंब आणि चालले राम मंदिर बांधायला, असा घणाघातही आमदार राणे यांनी केला आहे. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मुद्याचे राजकारण करण्यात येत आहे, यावर आमदार नितेश राणे यांनी शिवसेना टोला हाणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *