relax

मुळशी पॅटर्नच्या “उन उन” गाण्यातून दिसली ओम-मालविका यांची केमिस्ट्री

मनोरंजन

चहा हा आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण घटक बनला आहे. चहाला काही ठराविक वेळ नसली, तरी वेळेला मात्र चहा लागतोच, असे अनेक चहाप्रेमी आपल्याला सर्रास भेटतात. आजवर आपण प्रेमाची परिभाषा मांडणारी अनेक गाणी ऐकली आणि बघितली असतील. पण प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहाभोवती फिरणारी प्रेमी युगुलाची हटके अशी केमिस्ट्री ‘उन उन’ या गाण्यात बघायला मिळते.

‘मुळशी पॅटर्न’मध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर मुख्य भूमिकेत आहे, तर मालविका गायकवाड अभिनयात पदार्पण करत आहे. याच फ्रेश जोडीवर ‘उन उन’ हे अतिशय सुंदर असे रोमँटिक गाणे चित्रित करण्यात आले आहे. वैशाली माडे आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजाचा साज चढलेल्या ‘उन उन’ गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी आहेत, तर नरेंद्र भिडे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.

‘उन उन व्हटातून गुलाबी धांदल, वाफाळल्या पीरमाची मोगरी मलमल’ असे शब्द असलेल्या गाण्यातून चहाच्या वाफेसोबत दोघांच्याही मनातील प्रेमाला उकळी फुटलेली दिसते. चहासारख्या रोजच्या जगण्यातील पेयाला प्रेमाच्या नजरेतून बघण्याचा हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. प्रेमाचा नवा आशय आणि सतत गुणगुणत रहावीशी वाटणारी चाल ही या गाण्याची खास वैशिष्टय़े.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *