Dhangar-Samaj

पालकमंत्री केसरकर हे लोकांची दिशाभूल करत आहेत :रासप जिल्हाध्यक्ष किशोर वरक व धनगर समाज जिल्हा मुख्य संघटक सुरेश झोरे

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

सावंतवाडी : केसरी अलाटीवाडी येथील धनगर समाजाच्या घरांविषयी पालकमंत्री दिपक केसरकर हे लोकांची दिशाभूल करत असून धनगर समाजाला ब्लॅकमेलिंग करीत आहेत. पालकमंत्र्यांनी धनगर समाजातील पोरं शिकलीत, आता अडाणी राहिलेली नाहित, याची नोंद घेऊन ब्लॅकमेलिंग करणे सोडुन देऊन ग्रामपंचायतीस घर नंबर देण्याचे आदेश द्यावेत. तसेच पालकमंत्र्यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत केसरी अलाटीवाडीचा प्रश्न सोडवावा, नाही तर त्यांच्या विरोधात आंदोलन हे होणारच असा इशारा रासप जिल्हाध्यक्ष किशोर वरक व धनगर समाज जिल्हा मुख्य संघटक सुरेश झोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

केसरी अलाटीवाडी संदर्भात दिपक केसरकर यांनी धनगर समाजाची घरे इतरांच्या खाजगी जागेत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याचा समाचार किशोर वरक यांनी घेतला असून पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. केसरी अलाटीवाडीतील लोकांनी ग्रामपंचायतीकडे घरे बांधताना स्वत:चे स्वत:चे सातबारा व भूमी अभिलेखचे नकाशे जोडून रितसर बांधकाम परवानगी मागितली होती. मात्र त्यावेळी ग्रामपंचायतीने मायनिंग कंपनीची हरकत असल्याचे भासवून घर बांधण्यास परवानगी दिली नाही. मात्र सदर घरकुलांना शासनाने निधी मंजूर केला असल्याने पंचायत समितीने व जिल्हा परिषदेने कागदपत्रांची पडताळणी करूनच बांधलेल्या घरांना निधी दिला आहे. पण मायनिंग प्रकल्पाची एजंटगिरी करणा-या राघोजी सावंत याने काही लोकांना हाताशी धरून न्यायालयात खोटे दावे सादर करण्यासाठी प्रवृत्त केले असून सदरील खोटया दाव्या मागे राघोली सावंत व मायनिंग कंपनी यांचाच हात आहे. मात्र न्यायालयाने येथील घरकुलांना घर नंबा किंवा इतर कोणत्याही सुविधा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मनाई केलेली नसून ग्रामपंचायतीस, गटविकास अधिकारी यांनी लेखी आदेश देवूनही ग्रामपंचायत घरकुलांना नंबर देत नाही. यामागे केसरी सरपंच, राघोजी सावंत व दिपक केसरकर यांचेच राजकारण आहे. त्यामुळे दिपक केसरकर यांनी झारीतील शुक्राचार्याची भूमिका घेऊन लोकांची दिशाभूल करणे व धनगर समाजाला ब्लॅकमेंलिंग करून धमकावणे सोडावे, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *