mhada25

ऑनलाईन नोंदणीद्वारे म्हाडाच्या घरांसाठी पहिल्याच दिवशी २ हजारहून अधिक अर्ज

कोकण महाराष्ट्र मुंबई

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे १ हजार ३८४ घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरांसाठीची आॅनलाईन नोंदणी सोमवार दुपारी २ वाजल्यापासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी २ हजारहून अधिक आॅनलाईन अर्ज आले आहेत. सायंकाळी ७ वाजेपर्यंत २ हजार ४१६ अर्ज आले. लॉटरीसाठीचे पात्रता निकष, पॅन कार्ड, बँक तपशील, फोटो अशी आवश्यक माहिती तपासून २ हजार १८८ अर्ज स्विकारण्यात आले आहेत. या अर्जदारांपैकी ७०७ अर्जदारांनी अनामत रक्कम भरत घरांसाठी नोंदणी केली आहे.

म्हाडाने मुंबईकरांना दिवाळीभेट दिली असून मुंबई मंडळाच्या लॉटरीची घोषणा केली. सोमवारी पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी अर्ज भरले. स्विकारलेल्या २ हजार १८८ अर्जांपैकी ४९ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. लॉटरी पात्रतेसाठीची आवश्यक माहिती योग्य न भरल्यास, अर्जावरील फोटो अस्पष्ट किंवा चुकीचा असल्यास अर्ज रद्द करण्यात येतात.

लॉटरीसाठीचे पात्रता, निकष, आॅनलाईन अर्ज आदी लॉटरी संदर्भातील सूचनांसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. १० डिसेंबर आॅनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १६ डिसेंबरला वांद्रे (पू.) येथील म्हाडा मुख्यालयात लॉटरी निघेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *