nandgaokar-web

तर दिवाळीत पोकळ बांबूचे फटके देऊ, पालिकेच्या निष्काळजी अधिका-यांना मनसेच्या नितीन नांदगावकरांचा इशारा

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : महानगर पालिकेचा निष्काळजीपणा सर्वसामान्यांच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असे असताना पालिका प्रशासन संभाव्य दुर्घटना टाळण्याकडे कशी डोळेझाक करत आहे याचा नमुना मनसेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांनी समोर आणला आहे.

चेंबूर पूर्वमधील शेलकॉलनी रस्त्याच्या मधोमध तुटलेले झाकण आहे. गेल्या १५ दिवसांपासून हे झाकण तसेच आहे. पालिकेकडून केवळ लाल बावटा लावण्यात आला असून ‘डेंजर’चा बोर्ड लावण्यात आला आहे. या झाकणाची दुरुस्ती मंगळवार रात्रीपर्यंत केली नाही तर दिवाळीत पालिका अधिका-यांना पोकळ बांबूचे फटके देणार असल्याचा इशारा नांदगावकर यांनी ‘प्रहार वेब टीम’शी बोलताना दिला आहे.

चेंबूर पूर्व विभागातील शेलकॉलनी रस्ता या भागात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या परिसरात ये-जा करत असतात. तुटलेल्या झाकणामुळे वाहतूक कोंडी होतेच शिवाय नागरिकांना चालतानाही त्रास होतो. मी १५ दिवसांपूर्वी या भागात कामानिमित्त आलो असताना माझे लक्ष रस्त्यावरील त्या तुटलेल्या झाकणाकडे गेले. मंगळवारी मी पुन्हा या भागात कामानिमित्त आलो असताना ते झाकण तसेच असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. हा विभाग पालिकेच्या एम वॉर्ड अंतर्गत येतो. पालिकेचे रस्ते अभियंता पी.डी.नानावटे यांंच्याशी झाकण दुरुस्त करण्याबाबत माझे मंगळवारी बोलणे झाले. हे झाकण रात्रीपर्यंत दुरुस्त करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. हे आश्वासन त्यांनी जर पूर्ण केले नाही तर मनसे स्टाईल उत्तर देऊ, असा इशारा नांदगावकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *