accident

पर्यटनासाठी आलेल्या आईच्या हातातून पडल्याने ८ महिन्याच्या मुलीचा मृत्यू

कोकण महाराष्ट्र मुंबई

दापोली : मुरुड समुद्र किना-यावर पर्यटक महिलेला चारचाकी गाडीने धडक दिल्याने तिच्या हातातून पडून ८ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. अवनी अतुल बनसोडे असे मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे.

भंडारा येथील एक चारचाकी चालक अमित नखाते हा गाडी मागे घेत असताना मागे उभ्या असलेल्या सुजाता बनसोडे यांना या वाहनाचा धक्का लागला. यावेळी त्याच्या हातात असलेली आठ महिन्याची अवनी खाली पडली. चारचाकीचे चाक अवनीच्या डोक्यावरून गेल्यामुळे तिचा दापोली रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला. याबाबतची माहिती सुजाता अतुल बनसोडे (रा. पुणे, केशवनगर) यांनी दापोली पोलिसांना दिली. बनसोडे कुटुंबीय सोमवारी सकाळी साडेदहा वाजता दापोलीतुन मुरुडला गेले होते. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मुरुड बीचवर फिरण्यासाठी बनसोडे कुटुंब आले होते. भंडारा येथील मुरुड येथे आलेली गाडी क्रमांक एमएच ३६ एच ८४६३ मागे घेत असताना हा अपघात घडला आहे. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी भंडारा येथील संशयित गाडीचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत दापोली पोलीस ठाण्यात सुरू होती. या घटनेची माहिती कळताच दापोली पोलीस ठाण्याच्या निलम देशमुख, सुवर्णा ढेरे, मोहन कांबळे यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करीत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *