swabhimaan

येत्या १२ नोव्हेंबर ला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची वैभववाडी येथे जाहीर सभा

कोकण महाराष्ट्र मुंबई

वैभववाडी : वैभववाडी येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा सोमवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित केली आहे. या सभेला कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या भव्य पटांगणावर ही सभा होणार आहे. याबाबत आमदार नितेश राणे यांनी “मी येतोय” असे ट्विट केले आहे.

खासदार नारायण राणे यांचे विचार ऐकण्यासाठी वैभववाडी तालुक्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमान पक्षाचे जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी केले आहे. या जाहीर सभेला पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.

या सभेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमान पक्षाच्या गाववार बैठका सुरू आहेत. या बैठकीतुन तळागाळातील ग्रामस्थांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या जात आहेत. तसेच जाहीर सभेचे नियोजन गावागावात केले जात आहे. यासाठी तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती दिलीप रावराणे, शुभांगी पवार, रितेश सुतार, उदय पांचाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *