Virat.Kohli

विराट कोहलीला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी

क्रीडा

दिवसेंदिवस भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची लोकप्रियता वाढतच चालली असून क्रिकेटमधला असा कोणता विक्रम नाही, जो कोहलीने नावावर केला नसेल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने पत्र लिहिले आहे आणि त्यांनी त्यात कोहलीला देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची विनंती केली आहे.
सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. ज्याला भारत रत्न देऊन गौरवण्यात आलं आहे. विराटनं ७३ टेस्ट मॅचमध्ये ५४.५७ च्या सरासरीनं ६,३३१ रन केले आहेत. तर २१६ वनडेमध्ये कोहलीनं ५९.८३ च्या सरासरीनं १०,२३२ रन केलेत. ६२ टी-२०मध्ये ४८.८८ च्या सरासरीनं कोहलीच्या नावावर २,१०२ रन आहेत. विराटनं वनडेमध्ये ३८ शतकं तर टेस्टमध्ये २४ शतकं केली आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कोहलीनं सर्वात जलद १० हजार रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला. विराटनं २०५ इनिंगमध्ये १० हजार रन केले. याआधी हे रेकॉर्ड सचिनच्या नावावर होतं. सचिननं १० हजार रन २५९ इनिंगमध्ये पूर्ण केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *