MHADA-COPY-copy
कोकण महाराष्ट्र मुंबई

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे १ हजार ३८४ घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरांसाठीची आॅनलाईन नोंदणी सोमवार दुपारी २ वाजल्यापासून सुरू झाली. १० डिसेंबर आॅनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १६ डिसेंबरला वांद्रे (पू.) येथील म्हाडा मुख्यालयात लॉटरी निघेल.

मुंबईत आपले हक्काचे घर असावे यासाठी सर्वसामान्यांचे म्हाडाच्या लॉटरीकडे लक्ष लागून असते. म्हाडाने मुंबईकरांना दिवाळीभेट दिली असून मुंबई मंडळाच्या लॉटरीची घोषणा केली. लॉटरीसाठीची पात्रता, निकष, आॅनलाईन अर्ज आदी लॉटरी संदर्भातील सूचनांसाठी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ६३, अल्प उत्पन्न गटासाठी ९२६, मध्यम उत्पन्न गटासाठी २०१ आणि उच्च उत्पन्न गटासाठी १९४ घरांचा समावेश आहे. बांधकाम चालू असलेली १ हजार ११२ घरे असून २७२ विखुरलेली घरे आहेत. यांपैकी ‘रेरा’ प्रमाणपत्र प्राप्त १ हजार ११२ घरे, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त २६३ घरे आणि भोगवटा कार्यवाही प्रगतीपथावर असेली ९ घरे आहेत.
……………..
कुठे किती घरे?
अ‍ॅन्टॉप हिल वडाळा येथे २७८ घरे, प्रतिक्षानगर सायन ८९, गव्हाणपाडा, मुलूंड २६९, पी.एम.जी.पी. मानखुर्द ३१६, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प.) २४, महावीरनगर, कांदिवली (प.) १७०, तुंगा, पवई १०१, मुंबई इमारत दुरुस्ती व मंडळद्वारे प्राप्त ५० घरे, विकास नियंत्रण विनियम ३३(५) अंतर्गत प्राप्त १९ आणि विखुरलेली ६८ घरे आहेत.
………………
उत्पन्न गटानुसार घरांची विक्री किंमत
अत्यल्प उत्पन्न गट २० लाख आणि त्यापेक्षा कमी, अल्प उत्पन्न गट २० ते ३५ लाखपर्यंत, मध्यम उत्पन्न गट ३५ ते ६० लाखपर्यंत आणि उच्च उत्पन्न गट ६० लाख आणि त्यापेक्षा जास्त.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *