snp

श्रीनिवास पाटील यांच्या विवाह सोहळ्याला माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती; सेल्फी घेण्यासाठी तरुणाईने केली गर्दी

कोकण गावाकडच्या बातम्या नितीन पाटील महाराष्ट्र मुंबई

कोळेगांव, प्रतिनिधी
एस एन पी सॉफ्टवेअर चे प्रमुख मूळचे खवासपूर ता सांगोला येथील व सध्या माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील रहिवासी असलेले नितीन पाटील यांचे बंधू श्रीनिवास पाटील यांच्या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश नारायणराव राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वेळापूर येथील इंद्रनील मंगल कार्यालय येथे हा विवाह सोहळा पार पडला.याप्रसंगी निलेश राणे यांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. माजी खासदार निलेश राणे यांच्या आगमनाने शेकडो युवा कार्यकर्ते ,जेष्ठ नागरिक यांनी श्री राणे यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष जगदीश बाबर,पालघर जिल्हा अध्यक्ष विश्वास सावंत,संतोष पाटील,संतोष कांगणे,राज भोसले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *