homes

रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीमुळे धोकादायक घरांमध्ये आहेत रेल्वे कर्मचारी वास्तव्यास, स्थलांतर करण्याची मागणी

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना भविष्यात घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन कठोर पावले उचलत नसल्याचे दिसून आले आहे. मध्य रेल्वेच्या वर्कशॉपमधील टाईप वन क्वार्टर धोकादायक अवस्थेत आहे. असे असताना या क्वार्टरमध्ये अनेक रेल्वे कर्मचारी वास्तव्यास आहेत. अशा क्वार्टरमध्ये दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

मध्य रेल्वे वर्कशॉपमधील टाईप वन क्वार्टरमध्ये राहणा-या आनंदमोहन शर्मा या कर्मचा-र्याने ही बाब समोर आणली आहे. IOW व्यवस्थापनेकडून टाईप वन क्वार्टर धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे आपण राहत असलेली जागा राहण्यास योग्य नसून आपले स्थलांतर करावे याबाबतचे पत्र शर्मा यांनी रेल्वे व्यवस्थापकांना लिहिले आहे. घराचे छत ही अनेकदा कोसळले आहे. त्याची दुरूस्ती करण्यात आली. परंतु अशा क्वार्टरमध्ये राहणे धोकादायक असल्याचे शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे. RB3 येथील क्वार्टर रिकामे असून या ठिकाणी आपले स्थंलातर करावे अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. आपण वास्तव्यास असलेले ठिकाण धोकादायक असल्याचे शर्मा यांनी अनेकदा रेल्वे व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. धोकादायक घोषित केलेल्या क्वार्टरमध्ये दुर्घटना झाल्यास अनेक कर्मचा-यांचा जीव जाऊ शकतो, असे झाल्यास रेल्वे प्रशासन, पालिका आपत्कालीन कक्ष, पोलिस याची जबाबदारी घेतील का? असा सवाल गलगली यांनी केला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *