Drought

सततच्या दुष्काळाने त्रस्त असलेले ‘ खटाव ‘ तालुक्याचे लोक यंदा साजरी करणार काळी दिवाळी

कोकण गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कायम दुष्काळी तालुक्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याचा गणना केली जाते. वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके सोसलेला तालुका अशी खटाव तालुक्याची ओळख आहे. पण राज्य सरकारने महिनाभरात तीन वेळा सुधारणा करून जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये ‘खटाव’चा अद्यापही समावेश केलेला नाही. त्यामुळे खटावकर जनतेमध्ये संताप उसाळला आहे. सरकारच्या निषेधार्ह ‘खटाव’कर जनतेने काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीमध्ये जनता गोडधोड पदार्थ करण्याऐवजी खर्डा भाकरी खातील, आकाश कंदील लावणार नाहीत, काळ्या फिती लावतील, काळे आकाश कंदील लावतील. दिवाळीचा उत्साह कुठेही साजरा केला जाणार नाही. तालुक्यातील सर्व पक्षांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिली. खासदार राजू शेट्टी हे सुद्धा येत्या 6 नोव्हेंबर रोजी वडूज येथे येऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पवार म्हणाले.

या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, माजी उपसभापती नाना पुजारी, सामाजिक कार्यकर्ते धनंजय क्षीरसागर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष विजय शिंदे, सातेवाडी सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष अॅड. प्रमोद देवकर या नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.

येत्या 6 नोव्हेंबरपासून काळ्या दिवाळीला कुआरंभ होईल, असे पवार म्हणाले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *