Mulashi-Pattern-Movie-Poste

बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’मध्ये पुरुषोत्तम करंडक मधील पुरस्कार विजेते

मनोरंजन

महाविद्यालयीन तरुणाईच्या कलाविष्कारासाठी असणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक. या स्पर्धेत पारितोषिक मिळणे म्हणजे कलाकारांच्या कौशल्यावर मोहोर उमटवण्यासारखे आहे. या स्पर्धेत मानाची विविध पारितोषिके मिळवलेले अनेक कलाकार ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’मध्ये अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकासाठीचे अनंत नारायण आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी,अनिरुद्ध दिंडोरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे. अभिनेता ओम भूतकर, देवेंद्र गायकवाड, क्षितीश दाते, देवेंद्र सारळकर यांनी नटवर्य केशवराव दाते पारितोषिक पटकावलेले आहे. शैलेश देशमुख यांना निर्मल पारितोषिक, स्नेहल तरडे यांना माई भिडे आणि अक्षय टंकसाळे यांना काकाजी जोगळेकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्त्वाचे पुरस्कार पटकावलेल्या अनेक व्यक्ती एकाच चित्रपटात काम करतात, असा अनोखा योगायोग ‘मुळशी पॅटर्न’मध्ये जुळून आला आहे. अभिनेता प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *